Ad will apear here
Next
‘चतुरंग’च्या ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ला प्रतिसाद

पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमादरम्यान तरडे यांनी चित्रपटसृष्टीतील अनुभव कथन करताना माणूस म्हणून कसा घडत गेलो या सगळ्या प्रवासाबद्दल उपस्थितांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आपल्या आवडत्या कलाकाराचे पडद्यावरचे व्यक्तिमत्त्व आणि पडद्यामागे एक माणूस म्हणून त्या कलाकाराचे असणे, त्याचे कलाकार म्हणून घडत जाणे, सामन्यातून असामान्य होत जाणे या गोष्टी जाणून घेत इतरांना यातून प्रेरणा मिळाली या उद्देशाने ‘चतुरंग’तर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जातो. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZSHCA
Similar Posts
डॉ. देगलूरकर यांना ‘चतुरंग’चा ‘जीवनगौरव २०१७’ पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या डॉ. गो. बं. देगलूरकर यांना जाहीर झाला. तीन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चतुरंग प्रतिष्ठानच्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या ‘रंगसंमेलन २०१७’मध्ये डॉ. देगलूरकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल
रंगसंमेलनात रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रम पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे येथे प्रथमच होणाऱ्या रंगसंमेलनात ‘चतुरंग’ने पुणेकर रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रम आखले आहेत. सॅक्सोफोन आणि बासरीच्या ‘नाद नभांगणी नाचतो’ या वादनजुगलबंदीने रंगसंमेलनाला सुरुवात होणार आहे. विद्वान पं. कद्री गोपालनाथ आणि पं. रोणू मजुमदार यांच्या या ‘वादनारंगा’ला पं. अरविंद आझाद (तबला) आणि बी
‘चतुरंग’चे ‘रंगसंमेलन’ प्रथमच पुण्यात पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या ‘रंगसंमेलना’चे यावर्षी प्रथमच पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. आजवरच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीत २२ वेळा मुंबईत आणि तीन वेळा गोव्यात झालेल्या रंगसंमेलन सोहळ्यात लता मंगेशकर, पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. नारळीकर, डॉ. भटकर, साधना आमटे, पांडुरंगशास्त्री आठवले, डॉ
‘६६ सदाशिव’ चित्रपटाच्या पोस्टर, म्युझिकचे अनावरण पुणे : प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणाऱ्या ‘६६ सदाशिव’ या चित्रपटाचा पोस्टर, टीजर आणि म्युझिकचे अनावरण दिमाखात सोहळ्यात नुकतेच करण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती पुणे टॉकिज प्रायव्हेट लिमिटेड यांची असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language